Pani
Price in USD: $0.71
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | |
Date Published | 11, Aug 2024 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 134 |
Sample | Preview |
Share |
Category: Non-Fiction
water, farmer struggles, rural life, realism
पाणी चाखण्यापूर्वी... 'पाणी' ही कादंबरी रसिकांच्या हातात देताना आनंद होत आहे. पाणी प्रश्नावरची पाणी समस्या मांडणारी समानपाणी वाटपाचे महत्त्व मांडणारी, पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याच्या पद्धतीची मांडणी करणारी सामाजिक, राजकीय, आर्थिक समता प्रस्थापनाच्या क्षेत्रातील पाण्याचे स्थान मांडणारी अथवा मानवमुक्तीच्या लढ्यातील पाण्याची भूमिका मांडणारी अशा स्वरूपाची पाणी ही कादंबरी नाही. तशा प्रकारच्या अपेक्षा मनात ठेवून वाचकांनी या कादंबरीचे वाचन करू नये अशी विनंती करावीसी वाटते. पाणी ही पाण्यासाठी अविरत झुंज देणाऱ्या शिवा नावाच्या छोट्या कष्टकरी शेतकऱ्याची शोकात्म आणि शोकांत जीवनगाथा आहे. कादंबरीसारख्या कलात्मक ललित वाङ्मयात सत्य विविध रूपात वावरत असते. अस्सल वास्तवदेखील नावे, रूप, स्थळ, काळ, क्रम सारे बदलून समोर येत असते. येथेही ते तसेच आले आहे. असे असली तरी वास्तवाचे स्वतःचे असे खास रंग, वास असतात. चव असते. वास्तव आणि कला यांचा मेळ घालत असताना कलावंताची ओढाताण होत असते. वास्तवाचे आणि कलेचे सामर्थ्य हेच काही वेळेला त्यांच्या मर्यादा बनून समोर येते. या साऱ्याचा ताल, तोल, आकृतिबंध, प्रभावक्षमता आणि अपरिहार्यता नेमकी साधण्यात खऱ्या कलावंताचे वेगळेपण सामावलेले असते. 'पाणी'च्या लेखनामध्ये हे सारे कितपत साधले आहे, हे चोखंदळ वाचकांनी ठरवायचे आहे. शिवाची सारी कथा माझ्या समोर घडली आहे. ती सारी पात्रे आजही आपल्या कथाव्यथा घेऊन माझ्या भोवती वावरताहेत. कष्टकरी, शेतकरी त्याची स्वप्ने, त्याचे संचित, त्याच्या हातातली साधने, त्याच्या यशाच्या मर्यादा, अपयशाची निश्चिती, अमर्याद राबण्याचे आणि तरीही कसेबसे जीवन जगण्याची त्याच्यावर बहुतेक वेळेला येणारी पाळी, अशी शेतकरी जीवनाची अनेक अंगे घेऊन शिवाची कथा मला भिडली. कथारूप घेण्यासाठी आतल्या आत तगमगू लागली. निसर्गाचे लहरीपण, साधनांची कमतरता, जीवनातले ताबडतोबीचे अग्रक्रम, सत्तेची शेतकऱ्याकडे त्याच्या प्रश्नाकडे पाहण्याची उदासीन वृत्ती, स्पष्टपणे समोर न
Reviews