Jayanthi

₹90 ₹200 (55% off)
Price in USD: $1.06
Author Gautamiputra Kamble
Ediiton Language Marathi
Date Published 17, Aug 2024
Publisher Gautamiputra Kamble
Pages 188

Category: Non-Fiction

धम्मनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठी साहित्य, धम्मक्रांती, कथालेख, जयंती महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, धम्म तत्त्वज्ञान, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार, गौतमीपुत्र कांबळे, समता-बंधुता, आधुनिक समाज, धम्मक्रांतिप्रेमी, सामाजिक परिवर्तन, धम्माच्या परंपरा, समताधिष्ठित समाज, सामाजिक चळवळ, धर्मक्रांती, धम्माची दिशा, प्रतिक्रांती

गौतमीपुत्र कांबळे यांचे 'जयंती' हे पुस्तक म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर दहा वर्षांच्या अंतराने बदलत गेलेल्या जयंती महोत्सवाच्या स्वरूपावरील एक भेदक एक्स-रे रिपोर्ट आहे. धम्मक्रांती म्हणजे कार्ल मार्क्सपेक्षा अधिक निर्दोष असं जग बदलण्याचं क्रांतिकारी धम्म तत्त्वज्ञान । त्यातला आशय पुढील काळात कसा धूसर होत गेला आणि एका प्रतिक्रांतीला कसा जन्म देता झाला, यासंबंधी अत्यंत प्रामाणिक आणि तटस्थपणे या पुस्तकामधून कांबळे यांनी उपहासान्मक, मार्मिक भाष्य केले आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माला, विधी व परंपराग्रस्त धमचेि रूप कसे प्राप्त होत गेले हे दाखवून दिले आहे. तसेच उजव्या व डाव्या दोन्ही स्वरूपाच्या पोथिनिष्ठ विचारांची धम्मक्रांतीशी नेत्यांनी तत्त्वहीन सांगड घालत केलेल्या तडजोडीमुळे बाबासाहेबांना मानणारा समाज कसा भरकटत चालला आहे, याचे भेदक दर्शन पहिल्या चार 'जयंती'मधून लेखकाने घडविले आहे, तर पाचवी जयंती एक लोभस स्वप्न आहे. डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या विचारातली धम्मक्रांती आणि त्याद्वारे समताधिष्ठित समाज घडविण्याचे स्वप्न धम्मनगर या नव्याने वसवलेल्या गावात कसे साकार झाले याची रोचक कहाणी आहे. या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार आणि धम्मानुसार वर्तन करून गावकरी रोजच जयंती कशी साजरी करतात हे ५ व्या जयंतीमधलं चित्र प्रत्यक्ष साकार व्हावं, ही लेखकाची तीव्र मनीषा आहे, तिच्याशी विचारी वाचक नक्कीच सहमत होईल. एकूणच 'जयंती'मध्ये दर दहा वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या जयतीमधून बाबासाहेबांच्या पश्चात धम्मक्रांतीची चळवळ कशी निस्तेज होत गेली हे नेमकेपणाने लेखकाने टिपले आहे. समाजात पुन्हा धम्मक्रांतीचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान रुजावे व समता-बंधुता प्रस्थापित व्हावी, हा सम्यक विचार या पुस्तकाचा मध्यवर्ती गाभा आहे. नेमकी दिशा देणारे व धम्मक्रांतीसाठी समाजमन घडविण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल हे नक्की. मराठी साहित्याच्या ललित लेखनाच्या साऱ्या रूढ चौकटी मोडून एक नया साहित्य प्रकार, ज्याला मी कथेची रंजकता आणि लेखाची वैचारिकता असलेला 'कथालेख' म्हणेन, असा नवा साहित्य प्रकार गौतमीपुत्र कांबळे यांनी दिला आहे, त्याचे मराठी वाचक आणि धम्मक्रांतिप्रेमी निश्चित स्वागत करतील.

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Krantiveer indutai Patankar

₹50 ₹50 (0% off)