Dubanglele Swapna

₹50 ₹70 (29% off)
Price in USD: $0.60
Author vasanth mandle
Ediiton Language
Date Published 30, Nov -0001
Publisher Vasanth Mandle
Pages 98

Category: Fiction

Dubhanglela Swapna,Amar Shetye,Vasant Mandale,Marathi storytelling,Marathi author,literary contributions,Marathi stories,Marathi culture,Marathi books,Marathi fiction,Sahitya,literary acknowledgments,Marathi readers,debut story collection,Maharashtra literature,Marathi publishing,Marathi literature,Chandrakant Shetye,story collection,Sammitra Prakashan

माझा हा पहिलाच कथासंग्रह वाचकांच्या हातात देताना अतिशय आनंद होत आहे. या पूर्वी प्रकाशक चंद्रकांत शेट्ये यांनी माझी 'स्त्री नव्हे देवता', 'भरला घडा पापाचा', 'नात जुळलं प्रमाचं', ही नाटकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच सन्मित्र प्रकाशनने चरित्रात्मक बालवाड मयाची पुस्तके प्रकाशित केली आहेत. अंधारात खितपत पडलेल माझं साहित्य प्रकाशात आणून श्री. अमर शेट्ये यांनी लिखानास गती दिली. त्यांचा मी ऋणी आहे. साप्ताहिक विशाल विटाचे संपादक श्री. राजेंद्र निकम (अण्णा) यांनी माझ्या कथा वेळोवेळी प्रकाशित करुन मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांचे ऋण सदैव राहणार आहे. साहित्यक्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर पोहचविण्यासाठी माझी सुविद्य पत्नी सौ. सुवर्णा मंडले (एम्.ए. मराठी) हिने अमुल्य सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. माझा भविष्यकाळ उज्वल करण्यात तिचा अमुल्य वाटा आहे. 'दुभंगलेलं स्वप्न' या कथासंग्रहास मा. दादासाहेब जगताप माजी राज्यमंत्री महाराष्ट्रशासन, उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी स्वतःची तब्येत ठीक नसताना ही कथासंग्रहाचे सूक्ष्म वाचन करुन प्रस्तावना दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. प्राचार्य डॉ. घाटे व्ही. के. प्रभारी कुलगुरु शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वाचनात हा कथासंग्रह आल्यानंतर त्यांनी कथेच्या मांडणीची व कथा आशयाची स्तुति केली. माझे सहकारी मित्र प्रा. पवार सी. वाय., प्रा. शेवाळे डी. टी., मुख्याध्यापक श्री. पाटील बी. व्ही., श्री. मोरे जे. व्ही., अनिल महामुनी, एल. के. कोळी अशा अनेक हितचिंतकानी केलेले सहकार्य मी केव्हाच विसरु शकत नाही. या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. अनेक छोट्या- मोठ्या सहकार्यांचा मी आभारी आहे. वाचक माझ्या या कथासंग्रहाचे स्वागत करतील अशी आशा आहे.

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)