Tidyatla Koldanda

₹310 ₹360 (14% off)
Price in USD: $3.70
Author Shivaji Varude
Ediiton Language Marathi
Date Published 25, Aug 2024
Publisher Shivaji Varude
Pages 144

Category: Fiction

#साहित्यसंग्रह,मराठीसाहित्य,#वात्रटिका,#साहित्यप्रेमी,#मराठीलेखन,#तिढ्यातला_कोलदांडा,#मराठीवाचक,#समाजहित,#दैनिकललकार,#तरुणभारत,#मंगेशमंत्री

माझ्या प्रिय वाचक मित्रांनो, सप्रेम नमस्कार, आज माझा तिढ्यातला कोलदांडा हा वात्रटिका संग्रह आपल्या हाती देत असताना मनोमन आनंद होत आहे. तुमच्यासारख्या जाणत्या वाचकांनी भरभरून प्रेम दिल्यानेच मला घेण्याचे बळा मिळाले. ज्यांचे साहित्य कसदार असते ते साहित्य अजरामर टिकते. ज्यांनी ज्यांनी साहित्य लिहिले ते त्यांच्या मृत्यूनंतर अनंतकाळ राहले. साहित्यकृती कल्पनाप्रधान असली तरी तिची पाळेमुळे वास्तवाच्या जमिनीत खोलवर रुजलेली असतात. वास्तवा- तील घटना, प्रसंगाची निवड करून त्यांची पुनर्रचना करून आणि त्यात स्वतःची भर घालून लेखकाने साधलेले वास्तव समांतर अशी नवनिर्मिती असते. मुख्य म्हणजे ती समाजाच्या हितासाठी जन्मलेली असते. अनादि कालापासून साहित्याचा प्रवास समाजासह आणि समाजाच्या हितासह सुरू आहे. ज्या साहित्यकृतीद्वारे समाजाचे हित साधले जात नाही ती साहित्यकृतीच ठरू शकत नाही. असो, तिढ्यातला कोलदांडा हा माझा १३ वा वात्रटिका संग्रह आहे. अगदी सन २०११ पासून दैनिक ललकार या वर्तमानपत्रामध्ये वात्रटिका लिहिण्याचे भाग्य मला मिळाले. त्यानंतर सन २०१८ पा- सून ते आजतागायत महाराष्ट्राचे अग्रगण्य दैनिक तरुण भारत या वर्तमानपत्रांमध्ये सांगली जिल्ह्याचे मुख्य संपादक माननीय मंगेश मंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने वात्रटिका लिहीत आहे. ज्या दिवशी ज्या घटना घडतात, त्याच घटनेवर आधारित माझ्या वात्रटिका तयार असते. दूरदर्शनवरील बातम्या, वर्तमानपत्रातील चालू घडामोडीवर आधारित माझ्या वात्रटिका आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडीवर माझ्या वात्रटिकांना तुमच्यासारख्या जाणत्या वाचकांकडून मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आज घडीला माझ्याकडे पंधरा हजार पर्यंत तरी वात्रटिका असतील असे मला वाटते. मी माझ्या कोणत्याही पुस्तकामध्ये कोणा एका व्यक्तीला, समाजाला, पक्षाला टार्गेट केलेले नाही. कुणाचेही नाव न घेता या वात्रटिका लिहिल्या आहेत. केवळ मनोरंजन म्हणून आपण माझे साहित्य विचार वाचावेत. कोणत्याही समाजाच्या, व्यक्तीच्या भावना भडकवण्याचा माझा उद्देश नाही. माझे बारा वात्रटिका संग्रह देशासाठी लढणाऱ्या शूर जवानांना मी समर्पित केलेले आहेत. इथून पुढे जितके वात्रटिका संग्रह लिहिले जातील, ते सर्व देशासाठी लढणाऱ्या जवानांना समर्पित करणार आहे. प्राणांची बाजी लावून रात्रंदिवस देशाच्या संरक्षणासाठी जवान पहारा देत आहेत, म्हणूनच आम्ही रात्री शांतपणे झोपत आहे. त्याचबरोबर हा वात्रटिका संग्रह प्रकाशित करण्यासाठी इस्लामपूरचे प्रकाशक मा. राजेंद्र गवळी सर यांचा विशेष आभारी आहे. पुस्तकाला योग्य नाव आणि नावाला अनुसरून मुखपृष्ठ असेल तर कोणतेही पुस्तक उठून आणि प्रभावी दिसते, असे माझ्या मनातील मुखपृष्ठ रंगवणारे श्री. अविनाश कुंभार सर यांचाही मी ऋणी आहे. मला साथ देणारे माझे सर्व मित्र मैत्रिणी हितचिंतक, माझे संपूर्ण कुटुंबीय, या सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद ....! प्रा. शिवाजी वरुडे (वात्रटिकाकार)

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)