Anna Bhau Sathe-Sampurna Kranthikari Kalawanth
Price in USD: $0.30
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | |
Date Published | 11, Aug 2024 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 36 |
Category: Non-Fiction
Social Justice, Mahatma Jyotirao Phule, Literary Activism, Lokkalavant and Leadership, Political Leadership, nnabhau Sathe, Social Reformers, Indian Freedom Movement, Class Struggle Literature, Dr. Babasaheb Ambedkar
डॉ. बाबुराव गुरव "लोककलावंत हे लोकनेते नसतात, असे कांही राजकीय पुढाऱ्यांचे मत असते. कांहीजण तसे स्पष्ट बोलतात, तर कांहीजण संवदेनशील क्रांतीकारी कलावंतांना तशी दूय्यम दर्जाची वागणूक न बोलता देतात. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना तशी वर्तणूक देण्याचा प्रयत्न काहींनी केला. समाज प्रबोधन, परिवर्तनाच्या क्षेत्रातले वर्गसंघर्षाच्या चळवळीतले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले, गोवामुक्ती लढ्यातले, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गाच्या चळवळीतले ललित साहित्य निर्मितीच्या क्षेत्रातले आण्णाभाऊंचे निर्णायक लोकनेतृत्व नाकारणाऱ्यांनी त्यांना उपेक्षेने मारण्याचा कट रचला. पण हा चळवळीता धडाडता बॉयलर सर्वंकष विषमतेवर आग ओकत राहिला. कष्टकऱ्यांच्या, विषमतेचे बळी ठरलेल्या स्त्रीया, दलितांच्या मनात तप्त लाव्हारस ओतत राहिला. आज स्वतःला श्रेष्ठ समजणारे ते सारे विस्मृतीत गेले आहेत. आण्णाभाऊ मात्र क्रमशः तेजाळ बनत आहेत. "माझी शंभर भाषणे आणि वामनदादा कर्डकांचे एक गाणे समान आहे! असे जाहीरपणे मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुर्मिळ. नव्हे एकटेच. म्हणून ते परिवर्तनाचे पाईक ठरतात. हातात डफ घेवून सत्यशोधक जलशात जनसागरासमोर कडाडणारे, 'कुळवाडीकुळभूषण' शिवरायांचा पोवाडा' सादर करणारे महात्मा जोतिबा फुले लोकनायक ठरतात. व्यवस्था परिवर्तनाच्या वाटेवर ज्योती प्रकाश उधळत राहतात.
Reviews